*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हृद्य भावनां*
〰️〰️〰️〰️
विस्मरण कधी झाले नाही
आजही अंतरी ओढ आहे
हरवलेले क्षण सहवासाचे
स्पंदनी प्रीत हृदयस्थ आहे….
निर्मली आनंद उधाणलेला
मनांतरी रुंजी घालत आहे
सख्य कधी दुरावलेच नाही
अंतरी आजही रुजले आहे….
कलीयुगातील आसक्तींना
कुठेतरी थांबायचेच आहे
मानवतेच्या सात्विकतेला
कृतार्थी , साक्षात्कार आहे….
कां ? मनात वैरभाव धरावा
सारे सोडुनी जायचेच आहे
प्रारब्धी जन्ममरण सोहळा
मुक्तानंदी जगावयाचा आहे….
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*रचना क्र. ११९
*#©️वि.ग. सातपुते.( भावकवी )*
*📞 ( 9766544908 )*