डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी 25 जून पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 18 जून 2024 रोजीपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु बऱ्याच संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे डी.एल.एड अर्ज भरण्यासाठी दि. 25 जून 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.
याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे www.maa.ac.in या संकेस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घ्यावी.