You are currently viewing झाडे लावू झाडे जगवू

झाडे लावू झाडे जगवू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

 

*अनलज्वाला वृत्त*

*झाडे लावू झाडे जगवू*

 

झाडे लावू झाडे जगवू म्हणतो आपण

मुळासहित का झाड लाडके खणतो आपण

 

वृक्ष तापतो आणि सावली आम्हा देतो

तोडुन झाडे उन्हात का भणभणतो आपण

 

इथे बहुगुणी असंख्य झाडे रानोमाळी

दारापुढचा अनंत क्षुल्लक गणतो आपण

 

वृक्ष तोडले ढग अडले ना पाउस पाणी

फोडुन खापर दुसऱ्यावर फणफणतो आपण

 

सरणावरती जिवलग संगे वृक्ष जाळतो

अन् दुःखाने उगा अंतरी कण्हतो आपण

 

© दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा