You are currently viewing रंग लावतो नव्याने….

रंग लावतो नव्याने….

*मनस्पर्शी साहित्य परिवार तथा माझी लेखणी साहित्य समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रंग लावतो नव्याने….*

 

साऱ्या रंगात रंगुनी

नाही कळाला चेहरा

आज आठवेना मला

माझा चेहरा तो खरा

 

आयुष्याच्या मंचावरी

वठविली पात्रे किती

कुणी सांगेल का मला?

माझी ओळख कोणती?

 

ओठावरी हसू माझ्या

नाही तितकेसे खरे

दाटताती अश्रू डोळा

तेही कुठे ऐकणारे

 

आरसाही बोले मला

झाक तू अंतरी जरा

कसा दाखवू मी तरी

वेड्या! खरा तो चेहरा

 

भारी शिणलो आताशा

खेळ रंगांचा आगळा

रंग लावतो नव्याने

तोही रोजचा वेगळा

 

@अरुणा गर्जे

नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा