सावंतवाडी
अगदी लहानपणा पासून खेळाची आणि व्यायामाची आवड असलेल्या सावंतवाडीचे युवा नेतृत्व सुधीर आडीवरेकर यांच्या हातात पालिकेच्या आरोग्य आणी क्रीडा समिती सभापतीची सुत्रे देण्यात आल्यामुळे आता शहरातील स्वच्छता आणी क्रीडा क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे.दरम्यान आपल्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली आहे,ती निश्चितच पेलेन आणी सावंतवाडी डास मुक्त करण्यासोबत कारीवडे येथिल कचरा प्रकीया प्रकल्प मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून माझा पाठपुरावा असेल,असा विश्वास श्री आडीवरेकर यांनी व्यक्त केला.नुकत्याच झालेल्या पालिकेच्या विषय समिती सभापती निवडीत श्री आडीवरेकर यांची आरोग्य सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे आता त्यांच्याकडुन सावंतवाडीकरांच्या अपेक्षा आहेत.श्री आडीवरेकर हे मुळातच व्यायामपट्टू आणी क्रिकेट या खेळाची आवड असणारे अस्सल खेळाडू आहेत.दरम्यान नुकत्याच झालेल्या कोरोनाच्या संकटात त्यांनी सर्व प्रथम आपल्या प्रभागात सॅनिटायझर आणी मास्कचे वाटप केले होते.तसेेच अनेक गरजूंना वेळ प्रसंगी आर्थिक मदत करणे,रुग्ण तसेच अपघातातील जखमींच्या मदतीला धावून जाण्याची त्यांना आवड असल्यामुळे ते सर्वसामान्यांसाठी आपलेसे वाटतात.त्यातच आता त्यांना आरोग्य सभापतीपद मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते व चाहत्याबरोबर शहरातील नागरीकांकडुन सुध्दा त्यांना अपेक्षा आहेत.आणी त्यांच्या सर्व अपेक्षा आडीवरेकर पुर्ण करतील हा त्यांच्या टिमला विश्वास आहे.