You are currently viewing अंतिम साखळी सामन्यात विंडीजने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करून हा विक्रम मोडला, पूरन-चार्ल्सने केली अफगाणी गोलंदाजी उद्ध्वस्त

अंतिम साखळी सामन्यात विंडीजने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करून हा विक्रम मोडला, पूरन-चार्ल्सने केली अफगाणी गोलंदाजी उद्ध्वस्त

*अंतिम साखळी सामन्यात विंडीजने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करून हा विक्रम मोडला, पूरन-चार्ल्सने केली अफगाणी गोलंदाजी उद्ध्वस्त*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

टी२० विश्वचषक २०२४ चा ४० वा सामना आज वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने इतिहास रचला. निकोलस पूरन आणि जॉन्सन चार्ल्स यांच्या स्फोटक भागीदारीमुळे त्यांनी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. यासह वेस्ट इंडिज संघाने नेदरलँडचा १० वर्षे जुना विक्रम मोडला.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पहिली विकेट गमावली. अजमतुल्ला उमरझाईने ब्रेंडन किंगला सात धावांवर बाद केले होते. यानंतर निकोलस पुरन आणि जॉन्सन चार्ल्स यांनी सामन्याची सूत्र आपल्या ताब्यात घेतली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी झाली. यासह वेस्ट इंडिजने पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठी धावसंख्या उभारली. पहिल्या सहा षटकांत विंडीजने एका विकेटच्या मोबदल्यात ९२ धावा केल्या. टी२० विश्वचषकातील हा चौथा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. यापूर्वी हा विक्रम नेदरलँडच्या नावावर होता. २०१४ मध्ये त्यांनी आयर्लंडविरुद्ध एका विकेटसाठी ९१ धावा केल्या होत्या.

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडिजने चौथ्या क्रमांकाची पॉवरप्ले धावसंख्या बनवली आहे. या फॉरमॅटमध्ये १०० धावांचा टप्पा पार करणारा दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ आहे. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या सहा षटकात १०२ धावा केल्या होत्या.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीज संघाने दमदार कामगिरी करत चालू स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या केली. निकोलस पूरनच्या ९८ धावांच्या दमदार खेळीमुळे वेस्ट इंडिजने २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या. विशेष म्हणजे, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध वेस्ट इंडिजची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१३ मध्ये आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध २२५/७ धावा केल्या होत्या. त्याचवेळी, टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासोबत संयुक्तपणे ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज संघाने २० षटकात ५ विकेट गमावत २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ १६.२ षटकांत सर्वबाद ११४ धावांवर आटोपला. यासह वेस्ट इंडिजने हा सामना १०४ धावांनी जिंकला. अफगाणिस्तानचा या स्पर्धेत पहिला पराभव झाला. डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील विजयासह वेस्ट इंडिजने क गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. आता त्यांच्या खात्यात आठ गुण आहेत. याशिवाय त्यांची निव्वळ धावगती +३.२५७ झाली आहे. त्याचवेळी अफगाणिस्तान सहा गुणांसह आणि +१.८३५ च्या निव्वळ धावगतीने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

निकोलस पूरनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा