You are currently viewing सहजच…

सहजच…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सहजच………..*

 

इथेच येतो मी….

या रात्रीच्या प्रहरी..

एक अनामिक ओढ..

खेचून आणते मला..

तो आकाशातील एकुलता एक चंद्रमा …

तारकांची सोबत नसलेला..

एकटाच एकांतात..

स्तब्ध..शांत क़ोलाहल विरहीत..

या सागर लहरीसुध्दा

कशा निःशब्द मौन झाल्यात…

माझ्यासारख्याच अबोल…

गूढ..घनगंभीर…

खूप काहीतरी..

ह्रदयात साठलेलं

पण शांत ,स्थीर..

मीही तुझ्याच सारखा वाटतोस मला….

आणि म्हणून कदाचित…

माझी पावलं वळतात…

आपसूकच तुझ्याकडे…

तुला मी ओळखतो ..

व मला तू…

ही मौनातील भेट..

मनातलं खूप काही सांगून जाते ..

एकमेकांना..

आणि म्हणून ..

इथेच येतो मी …

या रात्रीच्या प्रहरी……..!

 

अरुणा दुद्दलवार✍️🌊

प्रतिक्रिया व्यक्त करा