You are currently viewing पावसाचा धर्म

पावसाचा धर्म

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पावसाचा धर्म* 

 

पाऊस आला पाऊस

पाऊस येऊन गेला

धो धो वाहून गेला

पाणी पाणी करणाऱ्यांना

पाणी पाजून गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला….

 

उन्हाने होरपळून

भाजलेल्या लाहीलाही

झालेल्यांना

गारव्याचे सुख देऊन गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला…..

 

शेत शिवार भिजले

बळीराजा सुखावला

दुष्काळाचे सावट

दूर करून गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला….

 

नदी नाले धरणे

विहीरी तळे भरून

धरणीला ओल देऊन गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला….

 

दरसाल आभाळातून

नेमेची येतो पावसा

थेंब थेंब पावसाने

घसा ओला करून गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला…..

 

तरीही मात्र तुझा

नाही कोणास भरवसा

परि रूबाब तुझा असा

साऱ्यांना दावून गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला…..

 

तू देव आमचा वरूण

जीवनदान देतो आम्हाला

तुझ्या विना जगणे कठीण

साऱ्यांना शिकवून गेला

पावसा तू ,

धर्म तुझा निभावला…..

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा