राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
अनुसूचित जातीच्या मुला- मुलीना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज • शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra. gov.in येथे नमूद संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह १२ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय ३ चर्च रोड, पुणे – ४११००१ येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, योजनेची सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र. ०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा.