You are currently viewing बाप..

बाप..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप…*

 

सुखदुःखात आधार खरा

बाप वाहता निर्मळ झरा..

चढला जरी कधी पारा

बाप जीवनी शीतल वारा…

 

संकट येता मदतीचा हात

बाप दिव्याची जळती वात

पाठीवर थाप अश्रूंना वाट..

बाप फेसाळती आनंदी लाट..

 

रडताना कुणा न दिसतो

बाप हुंदका गिळून हसतो

संकटांनी तो जरी घेरतो

बाप तयांस पुरून उरतो…३

 

तो पेलतो ओझे खांदावरी

बाप म्हणजेच जबाबदारी

कुटुंब घरसंसार सांभाळतो

बाप हृदयी चिंता पाळतो…४

 

लेक घरची लक्ष्मी मानतो

बाप लेकीत माता शोधतो

आपल्यांसाठी माघार घेतो

बाप तरीही बापच असतो ..५

 

©दीपक पटेकर (दीपी..)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा