You are currently viewing मदनलाल धिंग्रा

मदनलाल धिंग्रा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम लेख*

 

*मदनलाल धिंग्रा*

 

भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ,स्वदेश आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी

बलिदान केले . क्रांतिकारकांच्या कथा ऐकल्या तर अवर्णनीय शौर्य ,धैर्यआत्यंतिक छळ आणि फासाच्याच कहाण्या पहायला मिळतील. बारा _बारा वर्षाची बालके सुद्धा क्रांतिकार्यात होती. क्रांतिकारकांच्या इतिहासाचं पान उघडले की मदनलाल धिंग्रा हे नाव येतेच.

पंजाब प्रांत म्हणजे लढवय्यांचा आणि संतांचा प्रांत! याच प्रांतात मदनलालयाचाजन्म झाला .त्याच्यावडिलांनालोकडॉक्टरसाहेबदित्तायानावानेओळखत.एकमुलगाडाॅ. होण्यासाठी लंडनला गेला होता. तिथेच स्थायिक झाला होता. त्यांचा मुलगा मदनलाल याला पुढील शिक्षणासाठी लंडनला जायचे होते पण स्वखर्चाने ! म्हणून त्याने नोकरी करून पैसा कमावला आणि लंडनला गेला .एकोणीसशे सहा मधील जुलै महिना होता तो ! मदनलाल हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला होता. कर्झन वायली हा डॉ. दत्तांचा भारतीय मित्र ! त्यांचा मुलगाही कर्झन वायलीच्या जवळचा!कर्झन वायली हे प्रत्यक्ष भारतमंत्रांच्या धोरणावर नियंत्रण ठेऊ शकणा_या लंडनमधील ‘इंडिया आफिसचे’प्रमुखहोते.मदनलालमुळतचस्वच्छंदी जीवन जगण्याची हौसअसणारा!नवनवीन कपडे घालावेत, मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात हास्य विनोद करण्यात वेळ घालवावा,अशा प्रव्रूत्तीचा! एकदा मदनलाल इंडियाहाऊस मध्ये गेला असता, तिथे काही विद्यार्थ्यांसमोर सावरकरांना भाषण करत असताना त्याने पाहिले.भारतीय लोकांची आणि भारताची दयनीय अवस्था त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडली .सावरकरांची वक्त्त्रुत्व शैली अनेकांना आकर्ष्षित करत असे स्फू्र्ति देत असे. हे भाषण ऐकल्यावरमदनलालभारावून गेला .त्याच्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळाली. तो क्रांतिकार्याकडे वळला.एकदा बॉम्ब बनवण्याचे रसायन स्टोव्हवर उकळत होते उतरवले नाही तर स्फोट होणार, काहींना शारीरिक इजा होणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इंग्रजांची द्रुष्टी पडली तर क्रांतिकार्याचे नुकसान होणार हे निश्चित! धिंग्राने काचेचे भांडे हाताने उतरवले.हात प्रचंड भाजला. धिंग्राने सहजतेने हे सहन केले. मदनलालची निर्णयक्षमता आणि सहनशीलत याचा प्रत्यय सर्वांना आला.तरिही त्याचा हूडपणा बघून काहीजणांचा विश्वास बसेना.एकदा गप्पा मारता मारता वाद विकोपाला गेला.एकाने मोठी सुई घेतली, मदनलालचा हात पालथा ठेवला,त्यात सुई खुपसायला सुरवात केली ;सुई आत जात राहिली ,टेबलपर्यंत

पोचली,रक्त वाहू लागलं पण वेदनेचा स्वरही मदनलाल च्या तोंडून निघाला नाही असा शूर,वीर, लढवय्या होता मदनलाल !

मदनलालच्या मनात आता हौतात्म्याचेच विचार घोळत होते.या दरम्यान तो पिस्तुलाच्या निशाणबाजी केंद्रात जाऊन प्रशिक्षण घेत होता.न्याशनल इंडियन असोसिएशन ही लंडनमधली संस्था,भारतीय युवकांना इंग्रजांचा स्तु

तीपाठक बनवण्याचे काम करत होती.त्यातील तीन प्रमुख सदस्यात कर्झन वायली होता.एमा बेकही इथली सदस्य होती.इंडिया हाऊस मधील काही बातम्या सावरकरांच्या अनुमतीने कर्झननला सांगून तोत्याचा विश्वास संपादन करत होता आणि एमा बेकशी मैत्री संपादन करत होता.

एकदा मदनलाल सावरकरांना म्हणाला “देशासाठी प्राणार्पण करण्याची योग्य वेळ कोणती”? सावरकर म्हणाले,” जेंव्हा एकादी व्यक्ति वेळ आली आहे असे समजून स्वतः बलिदानासाठी सिद्ध होते, तेंव्हा ती वेळ आली असे समजावे”.मदनलाल म्हणाला,

” मग मी सिद्ध आहे.”याच दरम्यान बाबाराव सावरकर यांना काळयापाण्याची शिक्षा झाली होती. भारतीयतरुण आता सुडाने पेटले होते. संधीची वाट पहात होते.१ जुलै १९०९ हा नॅशनल इंडियन असोसिएशनचा वर्धापनदिन! मार्च १९०९ मध्येच ‘एमा बेक’ ला भेटून तिच्याशी मैत्री संपादन करून या क्लबचा मदनलाल सदस्य बनला होता. त्यामुळे वरील कार्यक्रमाच्या वेळीच आपला कार्यभाग साधायचा असा निश्चय त्याने केला होता. धिंग्राने त्या दिवशी नेहमीप्रमाणे जेवणखाण उरकले.निशाणेबाजीच्या क्लासला गेला. उत्तम सराव केला. मग समारंभाला साजेल असा अत्युत्तम पोषाख करून हॉलमध्ये उपस्थित झाला. हॉलची सजावट छान होती आणि येणारे स्त्री पुरूषही उत्तमोत्तम कपडे घालून आले होते. कर्झन वायली आला. कार्यक्रमासाठी रंगमंचावर सुमारे तासभर बसला. त्यानंतर खाली उतरून प्रत्येकाशी हस्तांदोलन करून बोलू लागला.तो मदनलालजवळ आला. काही गुप्त गोष्ट सांगायचीअसल्याप्रमाणे त्याच्या कानाजवळ जाऊन बोलण्याचाआविर्भाव केला. खिशातून पिस्तूल काढले आणि वायलीच्या छातीत गोळ्या झाडल्या.कसवजी लालकाका पुढे झाले. त्यालाही मदनलाल ने मारले. तिसरा एकजण पुढे आला.धिंग्राने त्याच्या गळ्यावर तडाखा दिला.त्याचे हाड मोडले.तोंडातून रक्त वाहू लागले.मदनलाल याला पकडल्यानंतर जेंव्हा नाडीचे आणि छातीचे ठोके बघितले तेंव्हा ते सामान्य होते.

मदनलाल धिंग्राचे हे नाट्य इथेच संपले नाही.५जुलैला cacstan हॉल मध्ये धिंग्रा चा निषेध

करण्यासाठी सभा भरली. मॉरिसनने धिंग्राच्या भावाचा हात धरून त्याला व्यासपिठावर आणले आणि भावाने पाठांतर केल्याप्रमाणे निषेधाची वाक्ये उच्चारली. अध्यक्ष आगाखान

यांनी’ ही सभा मदनलाल धिंग्रा याचा एकमताने निषेध करत आहे’ असे घोषित केले. ‘त्याचवेळी एकमताने नाही ‘ असा विरोधी स्वर उमटला. तुम्ही कोण असे अध्यक्षांनी विचारले ‘आणि त्याला खाली ओढा, हाकला’ असा दंगा सुरू झाला.मंचरजी व्यासपिठावरून उतरून धावू लागले. श्रोत्यांमधून आवाज आला,’ मी इथे उभा आहे. माझे नाव सावरकर ‘ एक युरेशियन सावरकरांवर चालून गेला. त्याने सावरकरांच्या कपाळावर फटका मारला. सावरकरांचा चेहरा रक्ताने भिजला. कपड्यांवरून रक्त ओघळू लागले. चष्म्याचा चक्काचूर झाला. सावरकर निश्चचपणे उभे राहिले व म्हणाले,’ इतके झाले तरी माझे मत प्रस्तावाच्या

विरुद्धच आहे.’ पामर सावरकरांवर हल्ला चढवत असता तिरुमल्लाचाऱ्यांनी त्याच्या मस्तकावर प्रहार केला. अय्यर गोळी चालवण्याच्या तयारीत होते. सावरकरांनी खुणेनेच त्यांना थांबवले.मंचरनी पोलिसांना बोलाविले पण सावरकरांची बाजू खरी असल्याने त्यांना सोडून

देण्यात आले. तिरूमल्लाचाऱ्यांच्या मागे ससेमिरा नको म्हणून वृत्तपत्राकडे सावरकरांनी पत्र पाठवले. अपराध सिद्ध झालेला नसताना सभेत गुन्हेगार वगैरे शब्द वापरत होते,हे न्यायाला धरून नव्हते म्हणून मी विरोध केला परंतु पामरने माझ्यावर हल्ला केला. या पत्रामुळे प्रकरण इथेच थांबले. कर्झन वायलीच्या वध प्रसंगी मदनलाल ने खिशात अंतिम वक्तव्य ठेवले होते.तेच तो वाचून दाखवणार होता पण त्याला ते दिले नाही. किंबहुना ते दडपून टाकण्यात आले. धिंग्राने आपले तोंडी वक्तव्य सांगितले.१६आगस्ट१९०९ हया दिवशी धिंग्राला फाशी देण्याचे ठरले.पण त्याचं वक्तव्य जगासमोर आणायचंच असं त्याच्या सहकाऱ्यानी ठरवलं .धिंग्राच्या फाशीच्या आदल्या दिवशी लंडन पुन्हा हादरले.धिंग्राच्या जबानीच्या सहस्रावधी प्रती रस्त्यावर वाटल्या जाऊ लागल्या .पोलिसांनातोंड बाहेर काढता येईना. डेली मिरर ने लिहिले की ही प्रत धींग्राच्या जबानीची हुबेहुब नक्कल आहे असे प्रतिपादन यात केले आहे.तसे नसेल तर सरकारने खरी प्रत लोकांना दाखवावी. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी सरकारची परिस्थिती झाली. धिंग्राची

जबानी खूप मोठी आहे. त्यातील हा काही भाग “त्या दिवशी, मी आपल्या देशातील देशभक्त तरुणांना ज्या फाशी व जन्मठेपेसारख्या अमानुष शिक्षा होत आहेत त्याचा अत्यल्प सूड म्हणून इंग्रजी रक्त सांडण्याचा प्रयत्न केला. तीक्ष्ण संगिनीच्या जोरावर गुलामगिरीत ठेवलेला देशनेहमीच यूद्धमान असतो. बंदुकीच्या अशक्यतेमुळे मी पिस्तुलचाच वापर केला.मी हिंदू आहेम्हणून माझ्या राष्ट्राचा अपमान हा प्रत्यक्ष ईश्र्वराचाच अपमान होय ,असा माझा दृढविश्र्वास आहे.कारणराष्ट्राचीपूजाहीचरामाचीपूजाहोय.आणिराष्ट्रसेवाहीचहीचकृृष्णभक्तीहोय.माझ्यासारख्या धन ,शरीर व बुध्दि या सर्वच दृष्टीने हीनदीन असलेल्या मुलाजवळ ,स्वतःच्या रक्ताच्या श्रध्दांजलीव्यतिरिक्त मातेला अर्पण करण्यासारखे दुसरे काय आहे?ईश्र्वराजवळ माझी एकच प्रार्थना आहे ती ही की,मानव्याची सेवा आणि परमेश्र्वराची पूजा करण्यासाठी,माझी माता जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मला पुन्हापुन्हा त्याच भारतात जन्म येवो व असल्याच कार्यात अशाच तऱ्हेचे मरण लाभो.

वंदे मातरम्!”

धिंग्राकडे अखेरच्या प्रार्थनेसाठी ख्रिती धर्मगुरू आले तेंव्हा ‘मी हिंदुधर्माप्रमाणेच मरणार’ असे त्याने सांगितले. तो वधस्तंभावर चढला तेंव्हा त्याला हातही द्यावा लागला नाही. काॅलेजचा पोषाख त्याच्या अंगावर होता. मदनलाल अमर झाला.

 

विद्या रानडें –

प्रतिक्रिया व्यक्त करा