सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १८ एप्रिल रोजी*
सावंतवाडी
येथील श्रीराम वाचन मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार १८ एप्रिल रोजीवाचन मंदिरात साजरा होत आहे.
श्रीराम वाचन मंदिरास १७३ वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून श्रीराम वाचन मंदिरचे माजी अध्यक्ष कै. ॲड. दीपक नेवगी कुटुंबिय यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सायंकाळी ६.०० वाजता कै. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार विश्वनाथ मंगेश उर्फ भाऊ नाईक यांना देण्यात येणार आहे. या निमित्ताने कीर्तनकार भाऊ नाईक यांच्या एका विशेष कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी विशेष कार्यकारी अधिकारी शहाजान ए. शेख आहेत. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम वाचन मंदिर कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी केले आहे.