You are currently viewing फादर्स डे स्पेशल

फादर्स डे स्पेशल

*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लेख*

 

*“फादर्स डे स्पेशल*

थोडं मनातलं….

*”पत्रास कारण की…*”

 

ति बाबांना सा न वि. वि .

तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आज हे पत्र का लिहित आहे? तर आज फादर्स डे आहे ( १६ जून) तसा तो रोजच असतो. कधी तुम्हाला थँक्यू ,सॉरी म्हणायची वेळ झाली नाही! तुमच्यावर कविता लिहिल्या , चारोळ्या टाकल्या, पण आज मनातलं तुम्हाला काही सांगावसं वाटतंय, आज या स्टेजला जेव्हा आम्ही पालक आहोत आणि बऱ्याच संघर्षातून जात आहोत तेव्हा तुमच्यातला बाबा तेव्हा का आणि कसा वाटला याचा उलगडा होतो य.

आमचा काळ 75- 80 दशकाचा !फारसा सुविधा नसलेला. टीव्ही, मोबाईल, वाहन नाही ,पगार ही तसा कमीच! पण त्यात ही तुम्ही आम्हाला उत्तम उत्तम कंपास,पुस्तकं ,पेन ,दप्तरं दिलीत. तुम्हीच आमचे गाईड आणि 21 अपेक्षित होतात .सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे असायची..

खरं तर बाबा या व्यक्तीची तशी भीतीच.कारण तेंव्हा अरे बाबा नव्हता. जे काय सांगायचं ते आईलाच. तीही शांत व गंभीर. तूम्ही तीच्या आजारपणात तीचं सगळं मनापासून केलंत व तीला बोनस आयूष्य दिलंय .

हल्ली parenting चे समूपदेशन असते. पण तुम्ही तूमच्या वागण्या – बोलण्यातून कसे वागावे व कसे वागू नये शिकवले. प्रवासाची आवड, कष्ट, हूशारी, दुसऱ्यांचा मान, जीवनाचा आनंद, खेळकर स्वभाव, लेखन वाचन कला, प्रत्येक क्षणात आनंद शोधणं,पैसा, इंधन, वीज, पाणी बचत हे धडे तेव्हाच आम्ही शिकलो.

बाबा, मला तूमचं कौतुक अशासाठीही पण आहे की ज्या वयात बहुतेक लोक निवृत्ती चा आनंद व तब्येतीच्या तक्रारी करत कुरकुरतात, तूम्ही तो उत्सव करता. देशोदेशीचे पर्यटन, त्यावर लिखाण ,माहीती सांगता. करोनातही स्वस्थ न बसता तूम्ही हलक्या फूलं क्या ७५-८० विषयांवर स्फुट लेख लिहुन अंतर्नाद पुस्तक प्रकाशित केले. त्याआधी काव्यांकूरही जन्मले.

कारण तुमचा प्रत्येक गोष्टीत आनंद घेण्याचा स्वभाव. व अभ्यासूपणे खेळकर पणे,साधेपणाने त्यातलं सौंदर्य शोधण्याची ,मांडण्याची कला!

तूमच्याशी बोलतांना अतिशय अभ्यासपूर्ण बोलावं लागतं. कारण राजकारणापासून गल्ली ते दील्ली तूम्ही जाणतात. आज वय जरी ८० च्या आसपास आलय तरी तूम्ही आम्हाला लाजवाल असा उत्साह. वाढदिवसाचे कार्यक्रम, गेट टूगेदर, सहली, तूम्ही पुढेच. भाषण, लेखन, टीम लिडिंग ला अग्रेसरच!

तूम्ही मला व भावाला कधी मारलं नाही. पण आमची शैक्षणिक प्रगती उत्तम व्हावी याची खूप काळजी घेतली. विचारातून आम्हाला घडवले. स्कौलरशीप, दहखवीसाठी कठोर परिश्रम घेतले, नवीन पुस्तकांची भेट मला दिलीत, आजही काही अडचण आली तर तुम्हाला पहिला फोन होतो. तूम्ही असेच आनंदी, उत्साही, कार्यमग्न, लेखन करत रहा, व उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा देउन हा पत्रप्रपंच संपवते..

 

आपलीच लेक,

सौ योगिनी वसंत पैठणकर – देशपांडे.

भाभा नगर. नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा