You are currently viewing पोलीस पाटील विश्राम दळवी यांचा मृतदेह सापडला

पोलीस पाटील विश्राम दळवी यांचा मृतदेह सापडला

पोलीस पाटील विश्राम दळवी यांचा मृतदेह घोटगे गावातील नदीपात्रात सापडला

दोडामार्ग / सुमित दळवी :-

घोटगेवाडी येथील पोलीस पाटील विश्राम गोविंद दळवी ( ४६ ) यांचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी घोटगे गावातील नदीपात्रात आढळून आला.

तीन दिवसांपूर्वी घोटगेवाडी तिलारी नदीवरील पुलावरून घोटगेवाडी गावचे पोलीस पाटील विश्राम दळवी हे मंगळवारी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले होते. स्थानिक ग्रामस्थ नातेवाईक व पोलिस यांनी शोधाशोध केली मात्र ते सापडले नाहीत त्यावेळी पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता कालांतराने पाटबंधारे विभागाकडून पाणी प्रवाह अजून कमी करण्यात आला.अखेर आज गुरुवारी घोटगे गावातील ग्रामस्थांना पुलाच्या वरच्या बाजूने मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी खात्री करुन पाहिले असता तो मृतदेह घोटगेवाडी येथील पोलीस पाटील यांचा असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या गावातील ग्रामस्थ व दोडामार्ग पोलीस तसेच तहसीलदार यांना फोनद्वारे माहिती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − sixteen =