You are currently viewing एटीएममधून पैशांऐवजी निघाला नाग ; पिंगुळीतील घटना

एटीएममधून पैशांऐवजी निघाला नाग ; पिंगुळीतील घटना

कुडाळ

एटीएम मधुन आपण पैसे घेऊन नक्किच बाहेर पडतो पण चक्क नाग एटीएम मधुन बाहेर पडतो हे आज पिंगुळी म्हापसेकर तिठ्यावरच्या बँक आँफ ईंडियाच्या ग्राहकांनी आणि ग्रामस्थांनी चक्क आपल्या डोळ्यांनी पाहिला. चक्क एटीएम मधुन बाहेर पडणार्या या नागराजाला कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्ग यांच्या पधकाने रेस्क्यु ऑपरेशन राबवित यशस्वीरित्या पकडले.
गुरूवारी दुपारी 2:30च्या दरम्यान कुडाळ, पिंगुळी म्हापसेकर तिठ्यावरच्या बँक आँफ ईंडियाच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी एक महिला जात असता त्या महिलेला एटीएम च्या दारातुन एक नाग जातीचा साप बाहेर पडताना दिसला. त्यांनी त्याची माहिती शेजारी असलेले साई वाळके यांना दिली . त्यानी तो प्रत्यक्ष बघुन लगेचच पिंगुळी चे कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अनिल गावडे यांना दिली. काही कारणासाठी वेंगुर्ल्याला गेलेले गावडे काही क्षणात घटनास्थळी पोहचले.
एटीएम मधुन बाहेर पडलेला नाग जातीचा साप शेजारी असलेल्या दगडाखाली लपुन बसलेला होता. लगेचच त्याला सुरक्षित पकडुन गावडे यांनी ग्राहकांच्या सुरक्षेच्या कारणासाठी बँक आँफ ईंडियाच्या मँनेजरशी पंधरा मिनटं चर्चा केली.लगेचच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. यावेळी बँकेचे अधिकारी, साई वाळके,कृष्णा मयेकर, गणपत सामंत, तुळशीदास पवार ,संतोष मुंडये,शितल रेडीज, बाबली परब, ग्रामस्थ आणि बँकेचे ग्राहक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा