कारिवडे येथे सुसाट इको कारची सहा आसनी रिक्षाला धडक
सावंतवाडी
येथील कारीवडे चर्च जवळील वळणावर इको कारने ६ आसनी रिक्षाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की इको कार शेजारील ओहोळात घुसली. ही घटना आज शुक्रवार दुपारी १२ वाजताचा सुमारास घडली. रिक्षा मधील ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबात अधिक माहिती अशी की इको कार आंबोली हून सावंतवाडीचां दिशेने येत होती. तर सहा आसनी रिक्षा सावंतवाडी हून आंबोलीच्या दिशेने जात होती. यावेळी कारीवडे चर्च शेजारील वळणार इको कारने रिक्षाला धडक दिली. इको कार चालक अनेक कारना ओव्हरटेक करत सुसाट येतं होता अशी माहिती प्रवाशांनी दिली.या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.


