*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कविता*
कविता आहे माझी
जिवाभावाची सखी .
सोडत नाही कधी
सोबतच सारखी.
निळ्या निळ्या समुद्रावर
फिरायला मी जाते.
कविता माझी सखी तेव्हा
मागे मागे येते.
मी जाते शाळेत तर
तीही सोबत असते.
तिच्याशी बोलतांना
मी मध्येच हसते.
स्वैपाकपाणी करताना
खाताना पितांना.
कविता असतेच जवळ
गाणेही गातांना.
अनुपमा जाधव