तिथवली येथे स्मशानभूमीत मधमाशांचा ग्रामस्थांवर हल्ला
अखेर पीपीई कीट घालून मृतदेहावर करण्यात आले अंत्यसंस्कार
वैभववाडी
स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना तिथवली येथे गुरुवारी सकाळी घडली. अखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तिथवली महंमदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा हरयाण वय ७० यांचे वृद्धापकाळाने बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी सकाळी १० : ३० वाजता नागरिकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरातून बाहेर काढला. यावेळी जवळपास ६० ते ७० ग्रामस्थ उपस्थित होते. विधी सुरू असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता. स्मशानभूमीत काही ग्रामस्थ सुकलेली लाकडे जाळून धूर करत होते. स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत ऐनाच्या झाडावर काळंबा मधमाशांचे पोळे होते. धुराचा लोळ त्या मधमाशांच्या पोळाकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या. उठलेल्या माशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ग्रामस्थ मिळेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटले. अनेक जणांना मधमाशांनी जखमी केले. मृतदेहावर देखील मधमाशा बराच वेळ घोंघावत होत्या.
मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. मधमाशा ग्रामस्थांची जवळपास एक किमी अंतरापर्यंत पाठलाग करत होत्या. अडीज तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाच पीपीई किट घटनास्थळी नेण्यात आले. मयत पांडुरंग हरयाण यांच्या मुलाने किट घालून विधी पूर्ण केले. इतर चार ते पाच जणांनी पिपीई कीट घालून स्मशानभूमीत जात त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. घडलेल्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*
*शैक्षणिक वर्ष 2024-2025*
*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*
*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*
🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*