मालवण :
तळाशील खाडीपात्रात शनिवारी रात्री होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमारांचा तीन दिवस उलटले तरी शोध लागला नाही. दरम्यान, मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने ड्रोनच्या मदतीने परिसरात शोध मोहिम घेतली. मात्र बेपत्ता मच्छिमाराचा शोध लागला नाही. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी काल सर्जेकोट येथे दाखल होत शोधमहिमेचा आढावा घेतला. दोन दिवस उलटले तरीही बेपत्ता मच्छीमार किशोर महादेव चोडणेकर यांच्या शोध न लागल्याने कोस्टगार्डला माहिती देण्यात आली. त्यानुसार हेलिकॉप्टरद्वारे शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र किशोर यांचा शोध लागला नाही. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी शोध मोहिमेचा आढावा घेतला त्यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
आज तिसऱ्या दिवशीही किशोर यांचा खाडीपात्रात शोध सुरू होता. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने सर्जेकोट तळाशील या भागात आज शोध मोहीम मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या शोध लागला नाही. या शोध मोहीम एक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर कांदळगावकर, सूरज रेडकर यांच्यासह स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थ सहभागी झाले होते.