महिलांची छेडछाड काढणार्या परप्रांतीयाला माजगावात यथेच्छ चोप…
परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा, सावंतवाडी पोलिसांकडे मागणी – अजय सावंत
सावंतवाडी
मद्यधुंद अवस्थेत महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करणार्या झारखंड येथील एका परप्रांतीय युवकाला माजगाव ग्रामस्थांनी यथेच्छ चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. उमेदराम मातुरा साब (वय २५, संध्या रा. माजगाव) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान घटलेल्या घटनेबाबत माजगाव येथील भाजपा कार्यकर्ते अजय सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी कामा निमित्त येणार्या कामगारांची पोलिसांची माहिती घ्यावी, अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामावर संबंधित युवक काम करतो. काल सायंकाळी मद्यधुंद अवस्थेत तो परिसरात राहणार्या एका महिलेच्या घरात घुसला होता. आज दुपारी त्याने परिसरातून जाणार्या एका महाविद्यालयीन मुलीची छेड काढली. याबाबत संबंधित मुलीने झालेला प्रकार तेथे असलेल्या अन्य ग्रामस्थांना सांगितला. यावेळी आपण काही केलेच नाही अशा अर्विभावात संबंधित तरुणाने उलट लोकांना विचारणा करण्यास सुरवात केली.
यावेळी संपत्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला यथेच्छ चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांची उशिरा पर्यंत चौकशी सुरू होती.
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*
*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!
*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩⚕👩⚕
*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/
*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*
_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._
_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._
_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*
*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*
https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*