You are currently viewing सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काळे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी विजय काळे यांची नियुक्ती

 

कुडाळ / प्रतिनिधी :

सिंधुदुर्गचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून विजय गणपत काळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार सोमवारी स्वीकारला. सन २०२१ पासून हे पद रिक्त होते. या पदाचा प्रभारी कार्यभार सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्याकडे होता.

नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे हे जालना उपप्रादेशिक कार्यालयातून बढतीने आले आहेत. सन २०१६ रोजी त्यांची सहा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रभारी उपप्रदेशीकपरिवहन अधिकारी म्हणून नंदकुमार काळे यांनी गेली दोन वर्ष चांगले काम केले. वाहन चालक-मालक यांच्यासाठी नव्याने सुरू झालेली ऑनलाईन प्रणाली व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळणारी सेवा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध केली होती.

रस्ता सुरक्षा व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नंदकुमार काळे यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा महसूल प्रशासन, पत्रकार, नागरिक, वाहन चालक-मालक स्वयंसेवी संस्था यांच्या सहकायनि विविध उपक्रम राबविले. नंदकुमार काळे आता सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून मूळ पदावर काम करणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा