You are currently viewing २७ जुलै ला बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिर वार्षिक जत्रोत्सव

२७ जुलै ला बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिर वार्षिक जत्रोत्सव

मालवण / मसुरे :

मसुरे गावची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जल मंदिराचा आषाढ महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव २७ जुलै २०२४ रोजी संपन्न होत आहे. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी, देवीचे राज्याबाहेरील भक्तगण सुद्धा या जत्रोत्सवाला उपस्थिती दर्शवतात. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असल्याने भाविकांचा जनसागर या दिवशी बिळवस येथे दिसून येतो.

जत्रोत्सवाच्या दिवशी म्हणजे २७ जुलै रोजी सकाळी विधिवत पूर्ण झाल्यानंतर भाविकांच्या ओट्या भरण्यास प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सांगता त्याच दिवशी सायंकाळी होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणे, तसेच ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी जल सातेरी देवालय ट्रस्ट व समस्त बिळवस ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा