*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्य कवयित्री सौ आदिती धोंडी मसुरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*टपटपच्या तालात गाणी गाऊया..*
रिमझिमत्या सरीत खेळ खेळुया
टपटपच्या तालात गाणी गाऊया ॥ धृ ॥
कोसळत्या जलधारा पाहू डोळ्यांनी
चमचमत्या गारांना झेलू हातांनी
माळरानी चिखलात खूप नाचूया
टपटपच्या तालात गाणी गाऊया ॥१ ॥
पावसाच्या तुषारांनी भिजले अंग
क्षणातच सृष्टीचाही बदले रंग
हिरवेगार रुपडे मनी जपुया
टपटपच्या तालात गाणी गाऊया ॥२ ॥
भेगाळल्या धरणीची शमली आस
तापलेल्या मातीलाही सुटला वास
झाडे वेली फुलांसंगे मुक्त डोलुया
टपटपच्या तालात गाणी गाऊया ॥ ३ ॥
*✒️© सौ. आदिती धोंडी मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*