You are currently viewing पावसाचे गाणे

पावसाचे गाणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

————————————

पावसाचे गाणे

————————————-

काळे ढग आकाशी जमती

लख लख विजा चमकती

मने आनंदाने भरून येती

पावसाचे गाणे म्हणती…

 

सरसर सरीत भिजती

खळखळ पाण्यात नाचती

मस्त पावसात भिजुनी

पावसाचे गाणे म्हणती…

 

पोरं सारी खट्याळखोडी

पाण्यात सोडी कागद होडी

मस्त पावसात चिंब भिजती

पावसाचे गाणे सारे म्हणती ..

—————————————

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा