You are currently viewing शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन

*शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षक परिषद मार्फत लाक्षणिक धरणे आंदोलन*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्ग मार्फत आज दिनांक १० जून २०२४ रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

उपरोक्त विषयान्वये आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे खालील प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात यावेत ही नम्र विनंती.
सिंजिप/शिक्षण/प्राथ/आस्था-२/५१६४ या शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या १३/०२/२०२४ पत्रानुसार गणित व विज्ञान पदवीप्राप्त उपशिक्षकांना पदवीधर शिक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी अंतिम सेवाजेष्टता यादीतील उपशिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले असून अद्याप त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही. ही रखडलेली प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी. विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया रखडलेली आहे तीही राबविण्यात यावी. इतर जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदलीस पात्र उमेदवारांना त्या त्या जिल्हा परिषदेने कार्यमुक्त करण्यात आलेली आहे. तरी आपल्याही जिल्हा परिषदेनेही पात्र शिक्षकांना कार्यमुक्त करावे. आंतरजिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी रक्कम अद्याप त्यांच्या खाती वर्ग करण्यात आलेली नाही ती लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच वरिष्ठ वेतनश्रेणी रक्कम शिक्षकांच्या खाती वर्ग करणे. या प्रमुख मागाण्यांसाठी सदर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. वरील मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले.
या धरणे आंदोलनास गणेश नाईक, निंगोजी कोकितकर, सुनिल करडे, रुपेश परब, प्रणिता भोयर, रुपेशकुमार गुंजाळ, आनंद तांबे वल्लभनाथ प्रभू, सरिता परब यांनी सहभाग घेतला.

*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा