You are currently viewing तिमाही ई आर 1 विवरणपत्र 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन भरावे

तिमाही ई आर 1 विवरणपत्र 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन भरावे

 – सहायक आयुक्त सुनिल पवार

सिंधुदुर्गनगरी 

शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही ई आर 1 विवरणपत्र 31 जानेवारी 2021 पर्यंत संबंधित आस्थानांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावे. असे आवाहन, कौशल्य विकास

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

            सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर- 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक आहे.ज्या उद्योजक ,आस्थापना यांना ऑनलाईन विवरणपत्र भरण्यास काही अडचणी येत असतील तर कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02392-228835 व संपर्क साधावा. असे आवाहन, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा