देवगड
देवगड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतिची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारीला होत आहे. 23 ग्रामपंचायतीच्या 71 प्रभागातून 189 जागासाठी ही निवडणूक होत आहे.आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि या शेवटच्या दिवसा अखेर 405 उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी दाखल केले आहेत.
यामध्ये कातवण 7 सदस्य पदासाठी 14 अर्ज,टेंबवली 7 सदस्य पदासाठी 10 अर्ज,पाटथर 7 सदस्य पदासाठी 11 अर्ज, घालवली 7 सदस्य पदासाठी 14 अर्ज कोर्ले 7 सदस्य पदासाठी 14 अर्ज पाळेकरवाडी 7 सदस्य पदासाठी 13 अर्ज, गढीताम्हाणे 7 सदस्य पदासाठी 14 अर्ज, रहाटेश्वर 7 सदस्य पदासाठी 8 अर्ज,मोंडपार 7 सदस्य पदासाठी 8 अर्ज,तांबळडेग 7 सदस्य पदासाठी 15 अर्ज,लिंगडाळ 7 सदस्य पदासाठी 23 अर्ज,मुणगे 9 सदस्य पदासाठी 21 अर्ज,,मिठबाब 9 सदस्य पदासाठी 20 अर्ज,इळये 9 सदस्य पदासाठी 19 अर्ज,कुणकेश्वर 9 सदस्य पदासाठी 29 अर्ज वाडा 9 सदस्य पदासाठी 23 अर्ज,मुटाट 9 सदस्य पदासाठी 19 अर्ज,नाडण 9 सदस्य पदासाठी 18 अर्ज,मोंड 9 सदस्य पदासाठी 16 अर्ज,वरेरी 9 सदस्य पदासाठी 18 अर्ज,तळवडे 9 सदस्य पदासाठी 21अर्ज,पुरळ 11 सदस्य पदासाठी 25 अर्ज,शिरगाव 11 सदस्य पदासाठी 32 अर्ज असे एकूण 405 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे , तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये शिवसेना, कॉग्रेस, राष्टवादी कॉग्रेस ही महाविकासआघाडी विरुद्ध भाजप अशी ही सरळ लढतच तालुक्यात पहायला मिळेल.
तर काही ठिकाणी गावपॅनल ,शिवाय मनसे देखील कातवण ग्रामपंचायत निवडणूक मैदानात उतरली आहे. उद्यापासून या उमेदवारी अर्जाची छाननी होणार असून 4 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे कालावधी असल्याने अंतिम चित्र 4 जानेवारी नंतरच स्पष्ट होणार आहे.