You are currently viewing आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- मा.अनुजा कल्याणकर

आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- मा.अनुजा कल्याणकर

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित लेखमाला*

 

*आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे:- मा.अनुजा कल्याणकर*

 

काही व्यक्ती फार कमी वेळ भेटतात. मात्र, आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवतात. साहित्य, संगीताची त्यांना लहानपणापासून आवड होती. तेच कलागुण त्यांनी जोपासले.

सुश्राव्य, सुरेल गायनाने मन जिंकतात. सालस, सुसंकृत सात्विक अनुजा ताई त्यामुळे लक्षात राहतात. हा वारसा त्यांना बाळकडू मिळाला आहे.

वडील स्व. गुंडेराव कुलकर्णी आणि आई यांच्यामुळे संगीत, काव्य त्यांना उपजत जमले.

धायरी येथील एका संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्या गीतांना ऐकले तसेच त्यांच्या कवितेने लक्ष वेधून घेतले. तीच त्यांची ओळख झाली.

त्या ऋजु, मृदू असल्याने सर्वांशी नम्रतेने वागतात.

बहुविध पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वात आहेत. त्या बी ए संगीत विशारद आहेत.पुण्यात आनंदनगर येथे अनुरव संगीत महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. सध्या त्या संस्थेच्या तीन शाखा क्रियाशील आहेत.

त्या अनुरव साहित्य कला अकादमी च्या अध्यक्षा आहेत. त्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवतात.

अनुरव प्रकाशन त्यांचे असून अनुरव हा दर्जेदार दिवाळी अंक त्या प्रकाशित करतात. आपल्या अंकातून नवोदित साहित्यिक, कवींना झुकते माप देतात.

त्या कवयित्री असून त्यांचे अनुरव, अनुबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेमुळे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. शांता शेळके स्मृती पुरस्कार, कवयित्री बहिणाबाई पुरस्कार, कवी ग्रेस काव्यप्रतिभा पुरस्कार असे काही पुरस्कार त्यांच्या

नावे आहेत.

चिरामय हा लेखसंग्रह देखील प्रकाशित झाला आहे.

गदिमा सन्मान, गजल काव्य मित्र सन्मान सारखे प्रतिष्ठीत सन्मान त्यांना लाभले आहेत.

पुण्यातील अनेक कविसंमेलनात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या प्रतिभेचा अविष्कार दाखविला आहे.

विविध दैनिक वृत्तपत्रांतून त्यांचे विविध विषयांवर लेखन नियमित असते. अनेक दर्जेदार दिवाळी अंकांतून त्या दरवर्षी लिहीतात.

पती मा. रवींद्र जी कल्याणकर यांच्या प्रोत्साहन, प्रेरणेने त्यांचे कार्य सुरू आहे.

शब्दांची रत्ने या यु ट्युब चॅनेल वर त्यांनी काव्यवाचन केले आहे. या बहुरंगी व्यक्तीमत्वाला सलाम.

 

बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा