You are currently viewing जेसीबीच्या धडकेत जखमी मनिषचा उपचारादरम्यान मृत्यू…

जेसीबीच्या धडकेत जखमी मनिषचा उपचारादरम्यान मृत्यू…

जेसीबीच्या धडकेत जखमी मनिषचा उपचारादरम्यान मृत्यू…

सावंतवाडी

जेसीबीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मनिष महादेव देसाई (वय १९, रा. खासकीलवाडा-कोठावळे पाणंद ) या युवकाचा गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी २ वाजता घडली. उद्या त्याच्यावर सावंतवाडीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्याच्या मित्रपरिवाराकडून देण्यात आली.
मनीष हा बारावीचे आपले मार्क लिस्ट आणण्यासाठी आपल्या महाविद्यालयात जात असताना कुटीर रुग्णालया समोर त्याचा अपघात घडला होता. यावेळी जेसीबीचा दात लागून त्याच्या गळ्याला दुखापत झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना ६ दिवसांपूर्वी घडली होती. त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबूळी येथे नेण्यात आले होते. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती जाण्यामुळे त्याचा मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा