आसोली-सक्राळवाडी येथील शेतकऱ्यांचा शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश…
प्रशासनाच्या विरोधात नाराजी; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार अर्चना घारेंचे आश्वासन…
वेंगुर्ले
आसोली-सक्राळवाडी येथील शेतकऱ्यांनी आज भर पावसात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी आपण वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शेतीत घुसणारे ओहोळाचे पाणी बंद करण्यासाठी कोणीच दखल घेत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. दरम्यान याबाबत आपण वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून योग्य तो न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन महिला नेत्या सौ. अर्चना घारे यांनी दिले.
यावेळी सौ. घारे म्हणाल्या, भर पावसामध्ये बांधावर शरदचंद्र पवारांवर विश्वास ठेवून ही मंडळी जाहीर प्रवेश करत आहेत. हा राष्ट्रवादी परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे. आमच्या परिवारात शेतकरी बांधवांच स्वागत करते. यापुढे तुमची अडचण ती आमची अडचण आहे. तुमच्यासाठी उपोषण करू, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. पण, शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देऊ असे त्या म्हणाल्या. यावेळी आसोलीतील रिया धुरी, प्रिया नाईक, हनुमंत धुरी, वसंत धुरी, मिलींद नाईक, लक्ष्मी मेस्त्री, नारायण मेस्त्री, उमेश धुरी, सिताराम सडेकर, रवी धूरी, हर्षदा धुरी, महादेव धुरी, महानंदा नाईक, सेजल नाईक, विलास मेस्त्री, रमेश भानजी, संजय भानजी, नंदकुमार भानजी आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला.
यादरम्यान सावंतवाडी माजी सभापती जगन्नाथ डेगवेकर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष योगेश कुबल, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब, ओबिसी अध्यक्ष सचिन पेडणेकर, आसोली विभाग प्रमुख बंटी कांबळी, तुळस विभाग प्रमुख अवधूत मराठे, उमेश कुंभार, प्रशांत नाईक, सुरभा धुरी, मोहन जाधव, नारायण करेलकर, उदय कांबळी, देवेंद्र देऊलकर यासोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
\