You are currently viewing किलर’ मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी ठरला तारणहार, नेदरलँडचा थरारक सामन्यात पराभव

किलर’ मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी ठरला तारणहार, नेदरलँडचा थरारक सामन्यात पराभव

‘किलर’ मिलर दक्षिण आफ्रिकेसाठी ठरला तारणहार, नेदरलँडचा थरारक सामन्यात पराभव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

टी२० विश्वचषकाच्या १६व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना नेदरलँडशी होता. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्स संघाने यापूर्वी दोनदा आयसीसी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या सामन्यातही नेदरलँडने कडवी झुंज दिली, मात्र मिलरने सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकवला.

‘किलर’ मिलरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सचा चार विकेट्सने पराभव केला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड्सने २० षटकांत ९ गडी गमावून १०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १८.५ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. मिलरने षटकार मारून सामना संपवला. मिलरने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजांनी राज्य केले. नेदरलँडच्या नऊपैकी आठ विकेट आफ्रिकन वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. ओटनील बार्टमनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याचवेळी मार्को जॅनसेन आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी कहर केला. मार्को जॅनसेनने मायकल लेविट (०) आणि विक्रमजीत सिंग (१२) यांना स्वस्तात तंबूमध्ये पाठवले. त्याचवेळी शेवटच्या सामन्याचा हिरो ठरलेला मॅक्स ओ’डॉड दोन धावा काढून ओटनील बार्टमनचा बळी ठरला. बास डी लीडेला ॲनरिक नॉर्टजेने तंबूमध्ये पाठवले. त्याला सहा धावा करता आल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने १० धावा केल्या आणि तेजा एनदामनुरू (०) खातेही उघडू शकला नाही. एडवर्ड्स धावबाद झाला, तर नदामानुरुला नॉर्टजेने तंबूमध्ये पाठवले. संघाने ४८ धावांत ६ विकेट गमावल्या होत्या. यानंतर सायब्रँड एंजेलब्रेक्टने सातव्या विकेटसाठी लोगान व्हॅन बीकसोबत ५४ धावांची भागीदारी करत नेदरलँडला १००च्या पुढे नेले. बार्टमॅनने एंजेलब्रेक्टला बाद करून ही भागीदारी भेदली. तो ४५ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४० धावा करून बाद झाला. त्यानंतर बार्टमॅनने टिम प्रिंगल (०) आणि लोगान व्हॅन बीक यांना बाद केले. व्हॅन बीकने २२ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने २३ धावांची खेळी केली. मीकरन एक धाव घेत नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. मार्करामच्या संघाची पुन्हा एकदा गळचेपी होईल, असे वाटत होते. मात्र, ट्रिस्टन स्टब्सने डेव्हिड मिलरसह पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिलरने येनसेन आणि केशव महाराज यांच्यासोबत छोट्या भागीदारी रचल्या आणि विजयाकडे नेले. रीझा हेंड्रिक्सला ३ धावा करता आल्या. त्याचवेळी क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांना खातेही उघडता आले नाही. हेन्रिक क्लासेनला ४ धावा करता आल्या. स्टब्सने ३७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. तर मार्को जॅनसेनला ३ धावा करता आल्या. मिलर ५९ धावा करून नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून व्हिव्हियन किंगमा आणि लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर बास डी लीडेला एक विकेट मिळाली.

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा