सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुरवार पासून मान्सूनचे आगमन झाले आहे. शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिनांक ९, १० व ११ रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्या ९ जून रोजी जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
सर्व नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला असून नियंत्रण कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२ – २२८८४७ किंवा टोल फ्री १०७७, ७४९८०६७८३५ पोलीस नियंत्रण कक्ष ०२३६२ – २२८६१४ पोलीस टोल फ्री हेल्पलाईन ११२, दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष ०२३६३ – २५६५१८, सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष ०२३६३ – २७२०२८, वेंगुला तालुका नियंत्रण कक्ष ०२३६६ – २६२०५३, कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष ०२३६२ – २२२५२५, मालवण तालुका नियंत्रण कक्ष ०२३६५ – २५२०४५, कणकवली तालुका नियंत्रण कक्ष ०२३६७ – २३२०२५, देवगड तालुका नियंत्रण कक्ष ०२३६४ – २६२२०४, वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष ०२३६७ – २३७२३९ या प्रमाणे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमाक साधावा.