You are currently viewing अणसूरला संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग १० जून रोजी

अणसूरला संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग १० जून रोजी

अणसूरला संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग १० जून रोजी

वेंगुर्ले

आनंद गावडे मित्रमंडळ व अणसूर ग्रामस्थ यांच्यावतीने अणसूर येथील श्री देवी सातेरी मंदिर येथे – सोमवार १० जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘कर्ण द्विकविजय’ या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. गणपती-अक्षय देसाई, रिद्धी सिद्धी- दिनेश मांजरेकर, भीष्म- यशवंत तेंडोलकर, शकुनी- प्रथमेश खवणेकर, दुर्योधन- प्रशांत मयेकर, कर्ण- गौरव शिर्के, राजा दृपद- उदय मोर्ये, इंद्र- आबा कलिंगण, रेवती- सुधीर तांडेल, बलराम- सुहास गावडे, कृष्ण- संजय काळे, प्रद्युम्न- सागर गावकर, व सांब- महेंद्र कुडव यांच्या भूमिका आहेत. नाट्यप्रयोगाला मयुर गवळी (हार्मोनियम), चंद्रकांत खोत (पखवाज) व राजू कलिंगण (तालरक्षक) यांची संगीतसाथ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा