You are currently viewing ‘परिवर्तन एक वादळ’

‘परिवर्तन एक वादळ’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम लेख*

 

*’परिवर्तन एक वादळ’*

         ‌‌ *(अर्थात)* 

*(सत्ता आणि सत्तांतर काळाजी गरज)*

***************************

या जगात अनेक विचारांची माणस आहेत प्रत्येक माणसांचे विचार वेगवेगळे असतात.वागण्याची तऱ्हा,बघण्याचा दृष्टीकोन बोलण्याची पध्दत वेगवेगळी असते ,प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो.म्हणून वेगवेगळ्या माणसांच्या स्वभावानुसार त्यांच्या वागण्या प्रमाणे इतर माणसे वागत असतात.पण काळानुरूप माणसाने स्वतःमधे बदल घडवून आणला पाहिजे.प्रगतीच्या दिशेने पावलं टाकायची असल्यास माणसात बदल होणे गरजेचे आहे.किंबहुना माणसांच्या आयुष्यात बदल हा झालाच पाहिजे.परिवर्तन झाल्या शिवाय माणसाची प्रगती होत नाही. बदल माणसाला घडवत असतो त्यामुळे व्यक्तिमत्त्व खुलते.वैचारीक पात्रता अधीक बळकट होण्यासाठी परिवर्तन आवश्यक असते.कारण परिवर्तनामुळे प्रगतीच्या वाटा मोकळ्या होत असता. प्रगतीच एक पाऊल म्हणजे व्यक्ती विकासाची नांदी आहे.जर माणसांच्या आयुष्यात परिवर्तन नसेल तर त्या जगण्याला काहीच अर्थ नसतो.म्हणून माणसांना बदल हवा असतो.लोकांना कसं साफ सुत्र व चांगलं बघायची सवय असते तेव्हा द्रृष्टी आणि सृष्टी अधिक सुदंर होण्यासाठी माणसांच्या आयुष्यात परिवर्तनाशिवाय पर्याय नाही.एका परिवर्तनाच्या वादळात जग बदलण्याची ताकत असते.म्हणून माणसाला तोच तोचपणा नको असतो.एक सारखं जगण्यात नैराश्य येते.मनात साचलेली मरगळ दुर करण्यासाठी बदल करायलाच हवा. म्हणून घरात सुद्धा कालांतराने काहीतरी बदल करावा लागतो. घालायचे कपडे सुध्दा काही दिवसांनी बदलून नवीन कपडे परिधान करतो. विरंगुळा म्हणून कुठेतरी सहलीला जातो एकाच ठिकाणी काम करून माणूस कंटाळतो म्हणून दुसऱ्या गावी बदली करून घेतो.अर्थात जागा बदलली की आपसूकच माणसांच्या विचारात परिपक्वता येते. तिच माणसं तेच ठिकाण सारखं सारख एकाच ठिकाणी राहून काहीसा विकासाला अडचणी येतात.म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर नवीन जागा नवीन माणसं कामाची पध्दत वेगळी त्यामुळे काहीतरी नवीन शिकायला मिळते, माणसं ओळखता येतात.वैचारीक पात्रता अधिक बळकट होते.माणस वाचता आली म्हणजे माणसाची कुठेच फसवणूक होत नाही त्यासाठी माणसांच्या आयुष्यात बदल होणे खूप गरजेचे आहे.एकाच ठिकाणी राहून किंवा त्याच त्याच माणसांत एकाच गोतावळ्यात माणूस बांधला जातो.अशा गर्दीतून सुटका करून घेण्यासाठी परिवर्तनाच्या दिशेने जाणे केंव्हाही चांगले असते.कारण वाट बदलली की दिशा बदलते आणि दिशा बदलली की प्रगती होते.प्रगतीच्या वाटेवर नवीन माणसं भेटतात त्या भेटीतून स्वतःमधे निश्चित बदल घडून येते.म्हणून घर असो वाट सत्ता तिथे परिवर्तन करावेच लागते.

काय असतं की जगात अशीही माणसं आहेत की कधी नव्हे अचानक नकळतपणे त्यांना घबाड सापडत म्हणजे काहींना अनपेक्षितपणे सत्ता मिळते तर काही एका रात्रीत श्रीमंत होतात किंवा एकदमच मोठ्या पदावर बढती मिळते तर काहींना अचानकपणे धनलाभ होतो आणि मग त्यांच्यात एक नकारात्मक बदल दिसून येतो त्यांचा द्रृष्टीकोन बदलतो.त्यांच्यात अहंमपणा ठासून भरला जातो गर्वाच पांघरूण अंगावर झाकून घेतात. मी म्हणजे सर्व काही,मीच येणार,मीच करणार,मीच होणारं त्यासाठी कोणात्याही स्तराला जाव लागलं तरी सदरचा माणूस काही विचार करत नाही.आशा वेळी चांगल्या वाईट परिणामाचा विचार केला जात नसतो. अनवधानाने झालेले परिवर्तन माणसाच्या मनामधे लालसा उत्पन्न करत असते.माणूस स्वार्थी होतो.

त्याला मिळाल मग मला का नाही, त्यांच्या जवळ आहे,मग माझ्याकडे का नाही.माझ्याकडे येण्यासाठी माणसाला काहीही चुकीचं करावं लागलं तरी सदराचा व्यक्ती कसलाच विचार करत नाही.माझ्या कडे जे आहे त्यात त्या माणसाच समाधान होत नसतं जे आहे त्यात आणखीन भर पडावी म्हणून वाट बदलली जाते कधी कधी त्याच्या कडचं हिसकावून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला हेतूपुरस्सर त्रास दिला जातो.आपल्या घरातच बघाना भावा भावांमध्ये देण्या घेण्यावरून भांडणं होतात, तुझं माझं होत.कुटूंबातही वाद होतात.भेदभाव हा कुठेही दिसुन येतो.कुठेही तुझं माझं होत रहातं जे मिळालं तेव्हढ्यावर माणसाचं समाधान होत नाही.जे आपल्या हाती आहे ते कायमस्वरूपी आपल्या जवळच असायला हवं म्हणून मुद्दामहून ऐखाद्याला कुठेना कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न होत असतो. आपल्याकडचं दुसऱ्याकडे जायला नको म्हणून कारणनसताना त्यांच्या कुरापती चव्हाट्यावर मांडल्या जातात.म्हणजे एखाद्याचा एव्हढ छळ केला जातो की ईच्छा नसतानाही संबधीत व्यक्तीला भितीपोटी शरणांगती पत्करावी लागते.त्याला स्वत:हून पराभूत व्हावे लागतं समोरच्या गोतावळ्यात सामील झाला म्हणजे त्याच शूध्दीकरणं होतं असतं आणि आपली तकात वाढल्याचा आनंद होतो.कुठेही बघा घर,कुटुंब, नातेवाईक सत्तेत सुध्दा.माणूस किती योग्य व किती अयोग्य यांचे परिक्षण होत असत.माणसांच्या वागण्यातून त्याचा स्वभाव कळतो त्याच्या स्वभावातुन त्याच्या मनातला हेतू ओळखला जातो.हेतू कळताच सावध होता नाही आलं तर समजायचं की माणसाचं मरण निश्चित आहे.कारण कोणाच्या मनात काय चाललय काही कळत नाही.काही माणसं इतकी चांगली इतकी भोळी असतात की द्रृष्ट लोकांवर सहज विश्वास ठेवतात आपलं समजून अगदी काळजाला लावतात पण त्या भोळ्या माणसाला माहित नसतं की ज्यांच्यावर आपण विश्वास टाकलाय ती माणसं गद्दार निघतील,काळजावर वार करुन घात करतील.पद प्रतिष्ठान सत्ता खूप वाईट असतं हो!पद प्रतिष्ठा माणसला कोणत्याही स्तराला नेऊन ठेवते आणि काहीही करायला लावते.कारण घरातला एखादी माणूस कुटुंब प्रमुख होतो किंवा कारभारी होतो.तेव्हा सारेकाही त्यांच्या ताब्यात आल्यावर सार काही त्यांच्या म्हणण्यानुसार चालतं तो जे सांगेल तसंच झालं पाहिजे असं त्याला वाटतं.नाही झालं तर मगं काहीतरी वाद उकळायचा आणि त्यात त्यांचा बळी द्यायचा.

सत्तेची सारी सुत्र आपल्याच हातात असायला हवीत हाच अहंमपणा जेव्हा माणसाच्या शिरावर बसतो.तेव्हा ज्याच्या हातात सुत्र आहेत तो जे सांगेल त्यावेळी त्याच ऐकाव लागतं त्याच्या समोर नतमस्तक होऊन शरणागती पत्करून स्वतःची सुटका करून घ्यावी लागते. खरतर दुसऱ्याला त्रास देणारी माणसं भिती दाखवून घाबरावणारी माणसं राक्षसी वृत्तीची असतात.स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी चाणक्य नीती वापरून चांगल्या माणसांचा बळी घेतला जातो.पण अशाने कोणाचंही बळ वाढत नाही.बळ वाढवण्याच्या नादात स्वतःच बळ कमी करून स्वतःला कमकुवत करून घेतात.जेव्हा अंगातलं बळ कमी होऊन पाय अडखळायला लागतात तेव्हा मदतीला कोणी येत नाही.पडल्यावर कोणी उचलत नाही.तुम्ही कितीही गयावया केली विनंती केली तरी तुम्हाला पाहून दूर होतील.अशा वेळी तुमच्या जवळ कोणी येणार नाही.कारण तुम्हाला मदत करण्यापुर्वी तुम्ही काय केलेल असतं,काय त्रास दिला असतो.याची आठवण होतं असते.तुमचा छळ आठवतो.म्हणजे माणसं कशी असतात बघा ना चांगल वाईटाचा विचार न करता पद,प्रतिष्ठा मिळवण्यासाठी,कायम आपल्याच जवळ राहण्यासाठी परर्वतनाच्या नादाता किती जणांनाचा बळी घेतला जातो.पण समाजाचं,आपल्या अवतीभवती असलेल्या माणसांच,देशाचं आपल्याकडे बारकाईने लक्ष असतं आपण काय करतो कसे वागतो काय बोलतो ते सारं बघत असतात.आपल‌ वागन चांगलं असलं तर माणसं दुर होत नाही. आपल्या अवतीभोवती गर्दी असते आणि ती गर्दी पाहून स्वत:ला खूप बलवान समजतो पण त्याच गर्दीतील कोणीतरी एक जण केव्हा घात करेल‌ यांचा अंदाज‌ नसतो तेव्हा आपल्या मागे आपलाही बाप आहे याचा विचार करून पद प्रतिष्ठेचा आनंद घेतला तर अशा आनंदावर विरजण पडते नाही. दुसऱ्याला कधीच कमजोर समजायचं नाही.समोरचा जर आपल्यावर भारी पडत असेल तर तोही काही कमी नसतो तो ही काहीना काही डावपेच आखत असतो.त्याच्याही मनात पराभवाची, विश्वासघाताची सल छळत असते.समोरच्याला जर विनाकारण त्रास दिला जात असेल तर तो ही शांत बसत नाही. जशाला तसेच उत्तर देण्यासाठी तो ही कटकारस्थानचं जाळ विणत असतो.तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून सुत्र हाती घेताना कायमस्वरूपी काहीच रहात नाही याचा विचार करूनच वागलं पाहिजे.रोज दारू पिऊन धिंगाणा घालणारा,रोज भांडणारा,रोज छळणाऱ्याला कोणी जास्त दिवस जवळ ठेवत नाही.मग तो कोणीही असु दे कुटुंब प्रमुख असो नाही तर सत्ताधारी असो त्रास असाह्य झाला की त्यांच्या पासून फारकत घ्यावीच लागते मते आणि मतांतराची गणिते मांडून काहीच मनासारखं होत नाही. लोकांच्या मनात काय चाल‌लय काहीच कळत नाही.तेव्हा जे आहे ते गपगुमान स्विकारून आपली प्रतिष्ठा कायम राहू द्यायची तेव्हाच तर आपल्या अवतीभवती गर्दी कायम राहिली. नाही तर परिवर्तन व्हायला काहीच वेळ लागत नाही.परिवर्तन म्हणजे एक वादळ आहे.वादळ फिरले की चांगले चागंले नेस्तनाबूत होतात.तेव्हा सत्तेचा माज नको, सत्तेचा गर्व नको‌,अहंमपणा तर मुळीच नको.घरात वावरणाऱ्या किंवा खुर्चीवर बसणाऱ्या माणसांच्या यशा अपयशाची सुत्रे आपल्याच माणसांच्या हातात असतात.केव्हा एकटं सोडून देतील काहीच सांगता येत नाही.कुठेही बळाच राजकारण न करता.समान,समता,समृद्धी प्रगती,आणि परिवर्तनाच राजकारण केलं तर आपलं घर कायम टिकून रहाते.दुसऱ्याच घर फोडाल तर आपलंही घर फुटणार आहे हे निश्चित असतं.म्हणून

*आपण केलेल्या कर्तृत्वाचा*

*गर्व नको अभिमान असावा*

*छळ कपटाने नेतृत्व करणारा*

*कोणी बदमाश बेईमान नसावा*

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा