You are currently viewing तू नयनांमध्ये दिसते

तू नयनांमध्ये दिसते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वृत्त भूपती* 

(२-८-८-४)

 

*तू नयनांमध्ये दिसते*

 

तू मिटता डोळे नयनांमध्ये हसते

अन् खळी लाजरी गालावरती खुलते ||धृ||

 

का असे अचानक भास तुझे मज होती

मग अवतीभवती शोधत डोळे फिरती

ना दिसता तू मन माझ्यावरती रुसते

अन् खळी लाजरी…||१||

 

येतेस कधी तू नकळत स्पर्शुन जाते

तव स्पर्शाने मन मोर पिसारा होते

नादात तुझ्या ते स्वतःस विसरुन बसते

अन् खळी लाजरी….||२||

 

ते क्षण भेटीचे मोहित मजला करती

गंधात न्हाउनी मिठीत क्षणभर शिरती

श्वासात सखे मन श्वास होउनी फुलते

अन् खळी लाजरी…||३||

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा