*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सरिता परसोडकर लिखित अप्रतिम बालगीत*
*🌹फुलपाखरू*
*वाटे मजला*
वाटे मजला फुलपाखरू व्हावे
हिरव्या कुरणावरती बागडावे//धृ//
निळसर डोंगर-दऱ्या कपारी
उडून बघावी दुनिया सारी
मनमौजेने स्वच्छंदी गीत गावे
हिरव्या कुरणा वरती बागडावे..//१//
कधी झरती त्या श्रावणधारा
घ्यावे वाटे मज कवेत वारा
पर्ण पोपटी हिंदोळ्यावर जावे
हिरव्या कुरणावरती बागडावे..//२//
रंगबिरंगी ते पंख घेऊनी
हुलकावणी ती मध्ये देऊनी
फुला फुला वरून मस्त गंध घ्यावे
हिरव्या कुरणावरती बागडावे…//३//
नको वाटे मज कुणी धरावे
गुणगुणत मी मस्त फिरावे
कधी निशेच्या कवेत जावे
हिरव्या कुरणावरती बागडावे..//४//
रूप माझे किती गोजिरे
लुकलुकणारे डोळे साजिरे
गुण कुणी का माझे वदावे
हिरव्या कुरणावरती बागडावे..//५//
सरिता परसोडकर
✒️