बाल धोरण व कृती आरखड्यासाठी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
महिला व बाल विकास विभगांतर्गत बाल धोरणाचा प्रारुप मसुदा तयार करण्यासाठी तज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांच्या समावेश असलेली समिती गठित करण्यात आलेली होती. या गठित समितीने महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 मसुदा तयार केलेला आहे. या प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा 2022 हा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
तरी सदर प्रस्तावित बाल धोरण हे मूळामध्ये इंग्रजी भाषेमध्ये तयार करण्यात आलेला असून त्यांचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. बाल धोरण व कृती आराखडा यामध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसुद्यामध्ये शब्द रचना, व्याकरण या संदर्भाने हरकती व सूचना नागरीकांकडून मागविण्यात येत आहे.
प्रस्तावित महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा 2022 च्या संदर्भाने नागरीकांच्या हरकती व सूचना दि. 30 जून 2024 रोजी सायंकाळी 6.15 वा. पर्यत महिला व बाल विकास आयुक्तालय, 28 राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ पुणे 01 या पत्यावर अथवा childpolicy@gmail.com या ईमेल वर पाठविण्यात याव्यात, असे आवाहन महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणेचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.