जामसंडे येथे ८ जून रोजी करियर महोत्सवाचे आयोजन
देवगड
दहावी बारावीचे नुकतेच रिझल्ट लागलेत त्यात नेहमीप्रमाणेच कोकण विभाग अव्वल स्थानावर आहे आणि नापासांची संख्या अगदीच नगण्य पण कुणी हे पहातं का ? की या पास झालेल्या विद्यार्थीसंख्येत किती टक्क्यावाल्यांची संख्या अधिक आहे? या पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 35% ते 55% मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.मग या विद्यार्थ्यांना करीअरचे मार्ग कोणते ? आणि याचेच मार्गदर्शन नसल्यामुळेच ही मंडळी पुढील काॅलेजीय शिक्षणासाठी आर्टस् साईडला प्रवेश घेतात किवा शहरात जावून वर्कर किंवा हेल्परची नोकरी करतात.
त्यांच्यासाठीही करीअरची विविध दालने असतात याची माहीती करुन देण्यासाठीच जामसंडे श्री मोरेश्वर गोगटे सभागृह, सांस्कृतिक भवन,येथे
शनिवार, दि. 8 जून 2024 रोजी सकाळी 9 वा.(9 ते 12 मार्गदर्शन व 12 ते 4 प्रत्यक्ष काॅन्सिलिंग व ॲडमिशन)
करीअर महोत्सव देवगडमध्ये पहिल्यांदाच असा भव्य मार्गदर्शन ते ॲडमिशन असा करीअर महोत्सव होणार आहे.
विद्या विकास मंडळ संचलित स्वर्गीय आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी सोहळ्यातील एक पुष्प म्हणून ॲड. अजित गोगटे आणि परिवारातर्फे हा करीअर महोत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये
हाॅटेल मॅनेजमेंट, टुरिझम, फॅशन डिझायनिंग, इंटिरीअर डिझायनिंग, काॅम्प्युटर यांचाही सहभाग असणार आहे. आयटीआय, कृषी विद्यालय हे ही सहभागी आहेत त्याचबरोबर किसान मोर्चातर्फे “शेती एक व्यवसाय” या करीअरवरही भर दिला जाणार आहे. स्पोर्ट्स, फोटोग्राफी, शिवणकला अशा महत्वाच्या विषयावरील करीअर विषयक सांगितली जाणार आहेत. सर्व कोर्स व करिअरसाठी एज्युकेशन लोनसाठी बॅंक मार्गदर्शन आहेच तसेच योग्य त्यांना प्रायव्हेट स्कॉलरशिप ही मदत दिली जाणार आहे.तरी देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील विद्यार्थी पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अशी माहिती भाई बांदकर व माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.