शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकास घरबांधणीसाठी आर्थिक मदत
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक संतोष लक्ष्मण गावडे रा. आंबोली ता.सावंतवाडी यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या वतीने घरबांधणीकरीता 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते अदा करण्यात आला.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर व लिपिक अनिल नाटलेकर हे उपस्थित होते. तरी जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी/विरमाता/ वीरपिता/ माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये/ अवलंबित यांनी अश्याप्रकारच्या कल्याणकारी योजनांचा (उदा.शैक्षणिक/स्वयंरोजगार/ पुनर्वसन) लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.