You are currently viewing मनोरमा वृत्त

मनोरमा वृत्त

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य तथा लालीत्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

 

*मनोरमा वृत्त*

 

*शीर्षक: चिंतातूर..*

 

मैत्र सखया दूर झाला

काळ ही निष्ठूर झाला

 

घाव नियतीचा मनावर

देव सुद्धा क्रूर झाला

 

रात्र वैरी वाटली अन्

जीव चिंतातूर झाला

 

पापण्यांनी बंड केले

आसवांचा पूर झाला

 

आळवीता दुःख अपुले

कंठ का बेसूर झाला?

 

कोण कोणाचाच नाही

एक हाची सूर झाला

 

आपले आपण पहावे

हा नियम मंजूर झाला

 

©दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा