You are currently viewing शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टी प्रत्येकी सहा टक्क्यांनी घसरला

शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टी प्रत्येकी सहा टक्क्यांनी घसरला

*शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टी प्रत्येकी सहा टक्क्यांनी घसरला.*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांदरम्यान शेअर बाजारात चार वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी सुमारे ६ टक्क्यांनी घसरले. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप स्पष्ट बहुमतापासून दूर असल्याचे निवडणूक निकाल आणि ट्रेंडवरून स्पष्ट झाले आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सेन्सेक्स ४,३८९.७३ अंकांनी किंवा ५.७४ टक्क्यांनी घसरून ७२,०७९.०५ या दोन महिन्यांहून अधिक नीचांकी पातळीवर बंद झाला. इंट्राडे ट्रेडमध्ये, सेन्सेक्स ६,२३४.३५ अंक किंवा ८.१५ टक्क्यांच्या घसरणीसह ७०,२३४.४३ या पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १,९८२.४५ अंकांनी किंवा ८.५२ टक्क्यांनी घसरून २१,२८१.४५ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. व्यवहाराच्या शेवटी तो १,३७९.४० अंकांनी किंवा ५.९३ टक्क्यांनी घसरून २१,८८४.५० अंकांवर बंद झाला. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याच्या दिवशी २३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सुमारे १३ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. पीएसयु, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, तेल आणि वायू तसेच भांडवली वस्तूंच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा बुकींग झाल्यामुळे शेअर बाजारात मंगळवारी घसरण झाली.

सार्वत्रिक निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने देशांतर्गत बाजारपेठेत भीतीची लाट निर्माण केली आणि नुकत्याच झालेल्या भरीव कामगिरीवर त्याचे पडसाद उमटले. असे असूनही, बाजारामध्ये स्थिरतेची अपेक्षा राखत आहे. युतीचे नेतृत्व अजूनही भाजपकडेच आहे आणि यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात सर्वाधिक जागा जिंकून तो देशातील सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. त्यामुळे मध्यम मुदतीत बाजारात मोठी घसरण दिसू शकते.

१६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा सेन्सेक्स २६१.१४ अंकांच्या किंवा ०.९० टक्क्यांच्या वाढीसह २४,१२१.७४ वर बंद झाला होता. त्याच वेळी, एनएससी निफ्टी ७९.८५ अंकांनी किंवा १.१२ टक्क्यांनी वाढून ७,२०३ वर पोहोचला. त्या दिवशीच्या व्यवहारादरम्यान, बीएससी बेंचमार्क सेन्सेक्स प्रथमच २५,००० अंकांवर पोहोचला होता.

२३ मे २०१९ रोजी, सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर, सेन्सेक्स २९८.८२ अंकांनी किंवा ०.७६ टक्क्यांनी घसरून ३८,८११.३९ वर बंद झाला, तर निफ्टी ८०.८५ अंकांनी किंवा ०.६९ टक्क्यांनी घसरून ११,६५७.०५ वर बंद झाला. त्या दिवशी बेंचमार्क बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने प्रथमच ४०,००० चा टप्पा गाठला तर निफ्टीने त्या दिवशी १२,००० चा टप्पा ओलांडला.

सेन्सेक्समधील ३० कंपन्यांमध्ये एनटीपीसी १५ टक्क्यांहून अधिक घसरले. तर स्टेट बँक ऑफ इंडिया १४ टक्क्यांहून अधिक घसरली. लार्सन अँड टुब्रो १२ टक्क्यांहून अधिक घसरला. पॉवर ग्रिडच्या समभागांनीही १२ टक्क्यांहून अधिक तोटा दाखवला आहे.

याशिवाय टाटा स्टील, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे समभागही घसरले. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात हिंदुस्थान युनिलिव्हर ६ टक्के आणि नेस्ले ३ टक्क्यांनी वधारले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एशियन पेंट्स आणि सन फार्मा यांचे शेअर्सही वधारले. एफएमसीजी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक मंगळवारी लाल रंगात रंगले.

लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीच्या ट्रेंडने मंगळवारी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी (एनडीए) निराशाजनक निकाल दिले, भाजपला उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले साधारण २९० जागा जिंकून केंद्रात एनडीए सरकार बहुमताने स्थापन करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (भाजप) आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतील, असे संकेत दिल्यानंतर मंगळवारी रुपया घसरला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ०.४७% घसरून ८३.५३ वर बंद झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारीनंतरची टक्केवारीत रुपयाची एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती.

&*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा