You are currently viewing माजगाव अपघातातील ‌केबिनमध्ये अडकलेल्या‌ एसटी चालकाला बाहेर काढण्यात यश

माजगाव अपघातातील ‌केबिनमध्ये अडकलेल्या‌ एसटी चालकाला बाहेर काढण्यात यश

माजगाव अपघातातील ‌केबिनमध्ये अडकलेल्या‌ एसटी चालकाला बाहेर काढण्यात यश

ग्रामस्थ व पोलीस मदतीसाठी धावले; अधिक उपचारासाठी कुटीर
रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी

माजगाव – तांबळगोठण परिसरात एसटी व खाजगी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात केबिनमध्ये अडकलेल्या एसटी चालकाला तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान बसचा
अपघात झाल्याची माहिती मिळतात घटनास्थळी मोठी गर्दी जमली
होती. त्या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी मदतकार्यात सहभाग घेत
जेसीबीच्या साह्याने केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर
काढले. सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात
घडला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी बस स्थानकावरून
पणजीच्या दिशेने जाणारी एसटी बस व गोव्याहून सावंतवाडीच्या
दिशेने येणारी खाजगी आराम बस यांच्यात माजगाव – तांबळ गोठण परिसरातील वळणावर अपघात झाला. यात एसटी बस चालक प्रशांत गवस (रा. नेतर्डे) केबिन मध्ये अडकले. यावेळी तेथे उपस्थित पोलीस व एसटी बसच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही बस बाजूला करून प्रशांत गवस यांना बाहेर काढले. ते बसच्या केबिनमध्ये अडकल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

त्यांना अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या
प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान आता दोन्ही बस
बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. यावेळी
पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, वाहतूक पोलीस राजा राणे,
सुनील नाईक, बाळा साटेलकर, दिपक दळवी, रुपेश नाटेकर, सचिन बिर्जे, बाळा कासार, राजू कुबल, चंद्रकांत कासार, आयुष कुबल, माजगाव उपसरपंच बाळा वेजरे, राकेश नार्वेकर, सौरभ कुबल आदींनी बचाव कार्य केले.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा