You are currently viewing तुळस येथे ८ रोजी महारक्तदान शिबीर

तुळस येथे ८ रोजी महारक्तदान शिबीर

तुळस येथे ८ रोजी महारक्तदान शिबीर*

वेंगुर्ले

-वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व सहयोगी संस्था विविध सहयोगी संस्थेच्या गुरुकुल शिक्षण संस्था, न्हावेली यांच्या सहकार्याने रक्तदानसारख्या क्षेत्रात योगदान देत २५ वे महारक्तदान शिबीर शनिवार ८ जून रोजी उत्सव मंगल कार्यालय, तुळस सकाळी ९ वा. आयोजित केले आहे. वेताळ प्रतिष्ठानच्या आतापर्यंत आयोजित रक्तदान शिबिरात ज्या-ज्या रक्तदात्यांनी नियमित रक्तदान करून अमुल्य योगदान दिले अशा सर्व रक्तदात्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या महारक्तदान शिबिरास आणि सन्मान सोहळ्यास रक्तदात्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा