You are currently viewing अवकाळी पावसामुळे फळपिकांचे ५४ लाखाचे नुकसान

अवकाळी पावसामुळे फळपिकांचे ५४ लाखाचे नुकसान

अवकाळी पावसामुळे फळपिकांचे ५४ लाखाचे नुकसान

१.५८४ शेतकऱ्यांना फटका

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १५८४ शेतकऱ्यांचे ५३ लाख ८० हजार १८० रुपयांचे नुकसान झाले आहे. बागायती आणि फळपिक मिळून १५१.४४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणी अहवालातून समोर आले आहे.जिल्हयात १ ते ३१ मे या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे महसूल, कृषी आणि जि. प. प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे पंचनामे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये ३३ टक्केच्या वर नुकसान झालेल्या जिरायत, बागायत व फळपिक इत्यादीखालील बाधित क्षेत्राचा समावेश आहे. बागायती पिकाचे २२.२० हेक्टर, तर फळपिकाचे १२९.२४ हेक्टरचे असे एकूण १५१.४४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.कुडाळ तालुक्याचा आकडा सर्वाधिक असून ८५.२६ हेक्टर क्षेत्रावरील ८२२ शेतकऱ्यांना २७ लाख २५ हजार ५०० रुपयांचा फटका बसला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा