*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*“देहरुपी गाभारा”*
गुप्त गाभारा असतो देहरुपी मंदिरात
आठवावे रूप विठूचे मने येती स्पंदनIIधृII
मकर कुंडले शोभती दिसे सुंदर ते ध्यान
विटेवरी उभा राहे भक्तांसाठी तिष्ठत
दर्शनातुर भक्त भेटीसाठी वाट पहातII1II
विचारांचे जेव्हा होते काहूर मनांत
काय करावे नाकळे तगमग शरीरांत
विठू दर्शनाने होते निर्मळ अंत:करणII2II
कोण मी कोठून आलो मनुष्य जन्मांत
येताना रिकामा आलो जाताना रिक्त हस्त
सत्कर्म करावे गोड बोलावे सांडू अहंपणII3II
संत सांगती घ्या रे नाम सदा मनानं
प्रपंच चिंता काळजी वाहील भगवंत
विश्वाचा त्राता देईल सुख शांती समाधानII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.