लोकसभा निकालासाठी भाजपा कार्यकर्ते रत्नागिरीला रवाना…
सावंतवाडी
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा निकालासाठी भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडीतील कार्यकर्ते रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. श्री देव पाटेकर व श्री.देव उपरलकर चरण आशीर्वाद घेत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे.
याप्रसंगी भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले,भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, भाजप नेते महेश सारंग, गुरुनाथ पेडणेकर, दिनेश सारंग, केतन आजगावकर, संतोष राऊळ, परिक्षीत मांजरेकर, सत्यवान बांदेकर, सुधाकर राणे, सुधा राणें ,सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.