निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट
कणकवली
लंडन मध्ये बसून उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत भाजपासोबत एनडीए मध्ये येण्यासाठी मीटिंग घेत वाटाघाटी करतात आणि भारतात येऊन मोदींवर टीका करतात हा दुटप्पीपणा बंद करा. नाहीतर लंडन मधील बैठकीचे सगळे फोटो, व्हिडीओ जाहीर करू असा इशाराच भाजप प्रवक्ते आमदार नितेश यांनी ठाकरे,राऊत यांना दिला.तर सांगली लोकसभा मतदारसंघाचे निमित्त शोधून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवलीत प्रहार भवन येथे भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आणि इंडि आघाडीची रडारड सुरू झाली आहे.संजय राजाराम राऊत ला निवडणूक आयोग म्हणजे बीजेपी चा एक्सटेंटेड हात हे 2024 ला जाणवले. 2014 आणि 2019 मध्ये राऊत ला जेव्हा बीजेपी सोबत शिवसेना होती तेव्हा असे वाटले नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच ध्यानधारणा केली नाहीय.2019 मध्येही त्यांनी देशातील प्रचार संपल्यावर ध्यानधारणा केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदींचे फोटो लावल्यामुळे उबाठा चे 18 खासदार निवडून आले होते. इंडिया आघाडीशी उबाठा सेना प्रामाणिक नाही. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर खोटे प्रेम उबाठा सेना दाखवत आहे.लंडन मध्ये उद्धव ठाकरे यांनी कुठल्या हॉटेलमध्ये बसून एनडीए मध्ये घेण्याबाबत बोलणी केली त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे लागेल. असा इशारा नितेश यांनी दिला.सांगलीमध्ये संजयकाका जिंकणार आहेतच. त्याच सांगली च्या जागेचे निमित्त करून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत. लोकसभा निकालानंतर उबाठा सेना इंडिया आघाडीतुन बाहेर पडणार असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला. लंडन च्या बैठकीत कोणी कुठले कपडे घातले होते, कोणी कोणती टोपी घातली होती. त्याचे सगळे फोटो आणि व्हिडिओ जाहीर करणार. निकालानंतर जर उबाठा सेना इंडिया आघाडीतून बाहेर पडली नाही तर मला प्रश्न विचारा असेही छातीठोकपणे राणे म्हणाले. एका बाजूने भाजपसोबत येण्यासाठी तडफडायचे, बिन शर्थ पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे भारतात आल्यानंतर मोदींवर टीका करायची हे सगळे प्रकार थांबवा अन्यथा तुमचे पितळ उघडे पाडू असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.देशहित आणि हिंदूधर्म हित,राष्ट्रहित साठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जर उबाठा सेना एनडीए मध्ये दाखल झाली तर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हला मान्य असेल असेही नितेश राणे यांनी सांगितले.