फुकेरी हनुमंत गडावर ६ रोजी शिवराज्याभिषेक सोहळा
सावंतवाडी
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा शिवराजाभिषेक सोहळा ६ जून रोजी फुकेरी येथील ऐतिहासिक किल्ले हनुमंत गडावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे साजरा होत आहे. हनुमंत गडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. यानिमित वेषभूषा स्पर्धा, इतिहासाची साक्ष देणारे मर्दानी खेळ व व्याख्यान हे या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वैशिष्ट्य आहे. या गडावर सकाळी सात वा. पूजन व आरती, सकाळी ८ वा. शिवकालीन मर्दानी खेळ व प्रात्यक्षिक, ९.३० वा. मान्यवरांचे स्वागत, १० वा. वेशभूषा स्पर्धा, नंतर व्याख्यान, बक्षीस वितरण व दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.यानिमित्त वेशभूषा स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा पाच मिनिटांची असून तीन ते १५ वर्ष वयोगटासाठी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. या वेशभूषा स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी नीलेश आईर ९४०४३६७७५२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन दिनेश सावंत यांनी केले आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ‘घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा’ या अभियानांतर्गत किल्ले हनुमंत गडाचे १० फुटी प्रवेशद्वार मोकळे करून प्रत्यक्ष शिवस्मारकं साकारण्यात आले आहे. सोहळ्याला समस्त दुर्गसेवक, शिवप्रेमी, फुकेरी ग्रामस्थांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभागाचे प्रमोद मगर, सुनील राऊळ व फुकेरी ग्रामस्थांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________