अल्पवयीन वाहनचालकांना रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे जिल्ह्यात ऑपरेशन “स्पेशल ड्राईव्ह” मोहीमे अंतर्गत कारवाई
सावंतवाडी
पुण्यात घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यापासून रोखण्यासाठी सिंधुदुर्गात “स्पेशल ड्राईव्ह” या मोहीमे अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांना १० हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई आज पासून पुढील १० दिवस राबविण्यात येणार असून त्यात सातत्य ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
आज पासून येथील गवळी तिठा परिसरात सावंतवाडी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.यात दारू पिऊन वाहन चालवणे, अतिवेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट, काळ्या काचा, यांच्यासह अल्पवयीन वाहनचालकांवर पोलिसांचा विशेष लक्ष असणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील १० दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे.