You are currently viewing सायबर गुन्ह्यांबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन

सायबर गुन्ह्यांबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन

सायबर गुन्ह्यांबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी :

सध्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. डेबिट-क्रेडिट कार्ड फ्रॉड / एटीएम फ्रॉड / ओटीपी शेअरिंग फ्रॉड, फिशिंग कॉल /SMS/ लिंक / कोणत्याही प्रकारचा संदेश (पुरस्कार, गिफ्ट व्हाउचर, लॉटरी), सोशल मीडियावर बनावट खाते निर्माण करुन पैशाची मागणी करणे, ऑनलाइन जॉब देतो असे सांगुन केलेले फ्रॉड, विवाह विषयक बनावट संकेतस्थळ निर्माण करून केली जाणारी फसवणूक, ऑनलाइन कर्ज ॲप संबंधित फसवणूक, वीज बिल फसवणूक, लैंगिक शोषण (फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया व्हिडिओ कॉल करणे आणि पैसे मागणे), QR कोड स्कॅनर पाठवून केली जाणारी फसवणूक, स्क्रिन शेअरींग ॲप डाऊनलोड करण्यास सांगुन केली जाणारी फसवणूक (उदा. ऍनी डेस्क/टीम व्हीवर), ऑनलाइन खरेदीविषयक फसवणुक, शेअर बाजार/गुंतवणूक/बचत/पॉलिसी संबंधित फसवणूक, टास्क संबंधित फ्रॉड इ. अशा वेगवेगळ्या फसवणुकीच्या माध्यमांव्दारे होणाऱ्या फसवणुकीस नागरीक बळी पडत आहेत. अशा सायबर गुन्ह्याबाबत सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.

काय करू नये

अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर पाठविलेल्या कोणत्याही लिंक्स उघडू नये. इंटरनेटवरील नोकरीसंदर्भात विशेषतः विदेशातील नोकरी संधींच्या जाहिरातींची खात्री करा, त्यांना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका आणि कोणतेही आर्थिक व्यवहार करु नये. आपणास बँकेकडून येणारे संदेश काळजीपूर्वक वाचावेत. विशेषतः OTP नंबर कोणालाही देऊ नये. लॉटरी बक्षीस लागल्याचे ई-मेल / कॉल/एसएमएस आल्यास त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे खाजगी फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करु नये किंवा व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून अशा आक्षेपार्ह कृती करू नये.
सोशल मिडीयाव्दारे अनोळखी व्यक्तींचे कॉल्स/व्हिडीओ कॉल्स स्विकारु नयेत. वेबसाईटच्या माध्यमातुन खरेदी करताना वस्तुची पडताळणी केल्याशिवाय किंवा वस्तु ताब्यात आल्याशिवाय कोणत्याही प्रकारची रक्कम आगाऊ भरणा करू नये. कस्टमर केअर किंवा अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन कोणत्याही प्रकारचे Screen Sharing Apps मोबाईल मध्ये डाऊनलोड कक नयेत. phonepe, Google pay इ. वापरताना तांत्रिक अडचण आल्यास गुगलवर सर्च करुन मिळालेल्या customer care नंबरवर कॉल करू नये. लॉटरी संदर्भातील कोणत्याही कॉल/संदेश/लिंक/ ईमेल ला प्रतिसाद देवू नये. ऑनलाईन टास्क पुर्ण करून पैसे मिळविण्याच्या आमिषाला बळी पडू नये.

काय करावे

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीस बळी पडल्यास तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टीग पोर्टल (NCCR portal) (https://cybercrime.gov.in) वर तक्रार नोंद करावी. किंवा हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करून तक्रार नोंदवावी.
मोबाईल गहाळ झाल्यास / हरविल्यास / चोरीस गेल्यास करावयाची कार्यवाही
भारत सरकारव्दारे मोबाईल चोरी / मोबाईल हरवणे याबाबतच्या तक्रारीबाबत मोबाईल ट्रेस करुन तो मोबाईल धारकांना परत मिळवून देण्याकरीता CEIR (Central Equipment Identity Register) हे ऑनलाईन पोर्टल विकसित केलेले आहे. या पोर्टलव्दारे ज्या व्यक्तींचे मोबाईल गहाळ होतात किंवा चोरीस जातात त्यांनी https://www.ceir.gov.in या बेवसाईटव्दारे CEIR( Central Equipment Identity Register) या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविल्यानंतर पोलीस विभागाकडून त्याबाबत तांत्रिक पध्दतीने सदरचा मोबाईल ट्रेस केला जातो व संबंधित मोबाईल धारकांना योग्य त्या कार्यवाहीने परत केला जातो.
नागरीकांचे मोबाईल गहाळ झाल्यास/हरविल्यास/चोरीस गेल्यास त्यांनी https://www.ceir.gov.in या बेवसाईटव्दारे CEIR (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा